भारत-फ्रान्स राफेल डीलला मंजुरी
केंद्र सरकारने फ्रांसकडून लढाऊ विमान राफेलच्या डीलला मंजुरी दिली आहे. डीलवर शुक्रवारी हस्ताक्षर झाले. सूत्रांच्या माहितीनुसार रफालची जी रक्कम फ्रांसच्या डसाल्ट एविएशन कंपनीने कोट केले होते त्यापेक्षा 4500 कोटी रुपयांपेक्षा कमी किंमतीत ही डील झाली.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने फ्रांसकडून लढाऊ विमान राफेलच्या डीलला मंजुरी दिली आहे. डीलवर शुक्रवारी हस्ताक्षर झाले. सूत्रांच्या माहितीनुसार रफालची जी रक्कम फ्रांसच्या डसाल्ट एविएशन कंपनीने कोट केले होते त्यापेक्षा 4500 कोटी रुपयांपेक्षा कमी किंमतीत ही डील झाली.
ही डील 7.8 अरब यूरो म्हणजेच 58 हजार 646 कोटी रुपयांची होती. भारताला एक रफाल लढाऊ विमान 1 हजार 628 रुपयांना पडलं असतं. पण आता त्यासाठी फक्त 1504 कोटी मोजावे लागले. सरकारने मात्र विमानाच्या किंमती जाहीर नाही केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 17 महिन्यआधी फ्रांसचा दौरा केला होता त्या दरम्यान फ्रांसकडून 36 रफाल विमान खरेदी करण्याचं जाहीर केलं होतं. या दरम्यान दोन्ही देशांमध्ये गवर्नमेंट-टू-गवर्नमेंट डीलसाठी एकमत झालं होतं. 18 रफाल फाइटर फ्लाई अवे कंडिशनने फ्रांसमधून येतील तर बाकीचे विमानं भारतात बनवले जातील. फ्रांसच्या या विमानाने जगातील इतर देशांच्या विमानांना मागे सोडलं आहे. भारताच्या संरक्षण खात्यात ही विमानं आल्यानी भारताची ताकत आणखी वाढणार आहे.