इंडोनेशियाला ६.५ क्षमतेचा भूकंपाचा धक्का
इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर अचेह भागाला भूकंपाचा जोरदार हादरा बसलाय. रिश्टर स्केलवर 6.5 क्षमतेच्या या भूकंपामुळे अनेक गावांमध्ये मोठी पडझड झालीये.
सुमात्रा : इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर अचेह भागाला भूकंपाचा जोरदार हादरा बसलाय. रिश्टर स्केलवर 6.5 क्षमतेच्या या भूकंपामुळे अनेक गावांमध्ये मोठी पडझड झालीये.
भूकंपामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 97वर पोहोचला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. सुमारे 1000 सैनिक, 900 पोलीस आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी बचावकार्य सुरू केलंय.
अद्याप अनेक ठिकाणी ढिगारे उपसण्याचं काम सुरूही झालेलं नाही. त्याखाली अनेक नागरिक अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. भूकंपग्रस्त भागात वीजपुरवठा अद्याप खंडित असल्यामुळे मदतकार्यात अडचण येतेय...
त्यातच पावसाची शक्यता असल्यामुळे रोगराई पसरण्याचाही संभव आहे. पि़डी जाया इथल्या एकमेव रुग्णालयामध्ये जखमींना दाखल करण्यात येतंय. मात्र तिथली आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचं चित्र आहे.