संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयावर योगा दिनाची झलक
आंतरराष्ट्रीय योग दिवसांच्या पूर्वसंध्येवर संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयवर योगासनाचं एक प्रतीक ठेवण्यात आलं आहे. मंगलवारी जगभरात योग दिनाचं आयोजन केलं गेलं आहे.
न्यूयॉर्क : आंतरराष्ट्रीय योग दिवसांच्या पूर्वसंध्येवर संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयवर योगासनाचं एक प्रतीक ठेवण्यात आलं आहे. मंगलवारी जगभरात योग दिनाचं आयोजन केलं गेलं आहे.
संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांनी याबाबतचं ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, योगाने संयुक्त राष्ट्राला प्रकाशित करण्याची तयारी केली आहे. न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र मुख्यालयातील इमारतीवर IDY 2016 च्या निम्मिताने योगासनाच्या एका आसनावर नजर.'
संयुक्त राष्ट्रात २१ जूनला कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमामध्ये जनरल अॅसेम्बली प्रेसिडेंट ही उपस्थित राहणार आहे. शिवाय अंडर सेक्रेटरी जनरल फॉर कम्यूनिकेशन्स अँड पब्लिक इन्फॉर्मेशन क्रिस्टीना गैलाक, ईसा फाउंडेशनचे संस्थापक आणि आध्यात्मिक गुरु जग्गी वसुदेव देखील उपस्थित राहणार आहे.