मुंबई : इस्रो आज एकाच वेळी आठ उपग्रह दोन वेगवेगळ्या कक्षेत अवकाशात सोडणार आहे. सकाळी 9 वाजून 12 मिनिटांनी, श्रीहरीकोटा इथल्या अवकाश केंद्रातून हे उपग्रह अवकाशात सोडले जाणार आहेत. हवामान, वातावरण, तसंच समुद्राची अद्यावत माहिती आणि छायाचित्रं, या उपग्रहांमुळे मिळू शकणार आहे. मुंबई आयआयटीचा 'प्रथम' हा उपग्रहही आकाशात झेपावणार आहे. 


भारत लवकरच १०० परदेशी उपग्रहांचं प्रक्षेपण करणारा देश ठरणार आहे. इस्रोने आतापर्यंत २० देशांचे ७४ उपग्रह प्रक्षेपित केलं आहे. आज प्रक्षेपण यशस्वी झालं तर तर परदेशी उपग्रहांची संख्या ७९ होणार आहे. पुढच्या महिन्यात भारत दोन आणखी परदेशी उपग्रहांचं प्रक्षेपण करणार आहे. भारताने परदेशी उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यास १९९९ मध्ये सुरुवात केली होती.