इस्तांबूल : तुर्कीमधील प्रमुख शहर इस्तांबूल येथील आतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळ स्फोटानी हादरुन गेलं. या भीषण स्फोटत आतापर्यंत ३६ जणांचा मृत्यू झालाय तर १४० हून अधिक जण जखमी आहेत. विमानतळाच्या कार पार्किंगमध्ये हे स्फोट घडवण्यात आलेत. तसेच स्फोटानंतर विमानतळातून फायरींगचेही आवाज आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा हल्ला दहशतवादी संघटना आयसीसनं केल्याचा दावा तुर्कीने व्यक्त केला आहे.दरम्यान या हल्ल्यातील मृतांचा आकडा ५०पर्यंत जाईल अशी भीती तुर्की सरकारच्या सूत्रांकडून व्यक्त करण्यात आलीये. आतातुर्क विमानतळावरुन मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक होते.


'द गार्डियन' या वृत्त पत्राने दिलेल्या माहितीनूसार एके-४७ असलेल्या काही अज्ञात हल्लखोरांनी विमानतळाबाहेर तैनात सुरक्षारक्षकांवर गोळीबा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या हल्लेखोरांनी विमानतळाच्या कार पार्किंगमध्ये हे स्फोट घडवले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. अनेक प्रवासी आपला जीव वाचवण्यासाठी जमिनीवर झोपले. या वर्षातला हा सर्वात मोठा हल्ला मानला जातोय..