नवी दिल्ली : भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर पीओकेमध्ये राहणाऱ्या लोकांनी पाकिस्तानच्या नागरीकांनी मोठा खुलासा केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार २८ आणि २९ सप्टेंबरच्या रात्री पीओकेमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. ज्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले.


माहितीनुसार पीओकेमधील त्या इमारतींना लक्ष्य करण्यात आलं जेथे दहशतवादी राहत होते. ही जागा भारतात घुसखोरी करण्याचा शेवटचा पॉईंट आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर दहशतवाद्यांची मृतदेह ही ट्रकमध्ये टाकून नेली आणि त्यांना दफन करण्यात आलं. त्यामुळे सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या लोकांना पाकिस्तानमधील लोकांनीच पुरावा दिला असल्याची चर्चा आहे.