लाहोर: भीषण बॉम्बस्फोटानं पाकिस्तानचं लाहोर शहर पुन्हा हादरलं आहे. या बॉम्बस्फोटामध्ये आत्तापर्यंत 53 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 100 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाहोरमधल्या गुलशन-ए- इकबाल पार्कमध्ये हा आत्मघातकी हल्ला झाला. रविवार असल्यामुळे या पार्कमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला आणि लहान मुलं आली होती. या पार्कमध्ये कोणतीही सुरक्षा नसल्याची माहिती आता समोर येत आहे. 


या आत्मघातकी हल्ल्यानंतर लाहोरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आणिबाणी घोषित करण्यात आली आहे. तसंच लाहोरमधली सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे.