नवी दिल्ली : परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे एका भारतीय व्यक्तीनं आपल्या पाकिस्तानी पत्नीला व्हिजा मिळण्यासाठी सोशल मीडियावरून मदत मागितली... आणि ट्विटरवर अॅक्टीव्ह असणाऱ्या सुषमा स्वराज यांनी या ट्विटर याचिकेला लगेचच प्रत्युत्तरही दिलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासिन नावाच्या या व्यक्तीनं केलेल्या ट्विटमध्ये, त्याच्या पाकिस्तानी पत्नीनं सप्टेंबर महिन्यात मुंबईला जाण्यासाठी व्हिजा अर्ज दाखल केला होता. त्यांचं बाळ एक 'स्पेशल चाईल्ड' आहे आणि त्याच्यावर उपचारासाठी पत्नीला मुंबईला जाण्यासाठी व्हिजा मिळावा, असं म्हटलंय. 



यावर, सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर यासिनला प्रत्युत्तर देत 'तुम्ही आपल्या पाकिस्तानी पत्नीला भारतीय व्हिजा मिळण्यासाठी रितसर अर्ज दाखल केलाय का? तसंच तुमच्या मुलाच्या उपचाराचा तपशीलही कळवा' असं म्हटलंय.


खुद्द परराष्ट्र मंत्र्यांनी यात लक्ष घातल्यानं यासिनच्या पत्नीला लवकरच व्हिजा मिळून त्यांच्या बाळावर लवकरात लवकर उपचार होतील, असं दिसतंय.