अमेरिकेतही `मराठा क्रांती मूक मोर्चा`
शहराच्या टाईम्स स्क्वेअरवर १६ ऑक्टोबर रोजी मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला. यात न्यूयॉर्क, न्यूजर्सी आणि कनमेक्टीकट या तीन राज्यातील सकल मराठा समाजाचा सहभाग होता.
न्यूयॉर्क : शहराच्या टाईम्स स्क्वेअरवर १६ ऑक्टोबर रोजी मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला. यात न्यूयॉर्क, न्यूजर्सी आणि कनमेक्टीकट या तीन राज्यातील सकल मराठा समाजाचा सहभाग होता.
मराठा मोर्चाच्या मागणींविषयी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र चव्हाण यांना ईमेलद्वारे तर भारतातील न्यूयॉर्क येथील राजदूत सौ.दास यांना भेटून निवेदन देण्यात आले.
न्यूयॉर्कमध्येही ८ युवतींमार्फत निवेदन सादर करण्यात आले. न्यूयॉर्क सिनेटर चक शूमर आणि भारतीचे यूएनमधील दूत सईक अकबरूद्दीन यांना निवेदन देण्यात आलं.