नवी दिल्ली : भारताला हवा असलेला कुप्रसिद्ध डॉन दाऊद इब्राहिम भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या डोळ्यात धूळ फेकत शॉपिंग करत असल्याचे पुढे आले आहे. दाऊदला पकडण्यासाठी सुरक्षा यंत्रणा डोळ्यात तेल घालून प्रयत्न करीत आहेत. मात्र, चक्क पाकिस्तानात बसून दाऊद खरेदी करत असल्याचा खुलासा झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दाऊदने स्वत:च्या सुरक्षेसाठी खास दुबईतून बुलेट प्रूफ गाड्या मागवून घेतल्या आहेत. दाऊदसाठी मदत करणारी व्यक्ती तारिख असून तो दुबईत राहतो. याबाबत भारतीय गुप्तचर यंत्रणा इंटेलिजन्स ब्युरोला (आयबी) ऑक्टोबर 2014 मध्ये माहिती मिळाली होती.


सूत्रांच्या माहितीनुसार गुप्तचर यंत्रणा दाऊदचा शोध घेत आहे. दाऊदच्या सल्लागाराने दाऊदला सांगितले की, कधीही हल्ला होऊ शकतो. त्यानंतर दाऊदने दुबईतून खास या गाड्या मागवून घेतल्या आहेत. दाऊदच्या मागणीनुसार या गाडीत बदलही करण्यात आले आहेत.


खास सूत्रांकडून सांगण्यात आले की, दाऊदच्या मागणीनंतर तारिकने दुबईत टोयोटाची लॅंड क्रूजर खरेदी केली आणि संधी मिळताच त्यांने ही कार पाकिस्तानात पाठवली. याआधीही तारिकने दुबईत राहून दाऊदला मदत केली आहे. 2009मध्येही दुबईतून दाऊदसाठी तारिकने गाड्या कराचीत पाठवल्या होत्या.