व्हॅटिकन सिटी : पीडितांसाठी केलेल्या कामामुळे जगभर प्रसिद्ध असलेल्या ख्रिस्ती नन भारतरत्न मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हॅटिकन सिटीत झालेल्या सोहळ्यात पोप फ्रान्सिस यांनी मदर तेरेसा यांना संत ही उपाधी बहाल केलीय. या सोहळ्याला परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सुद्धा उपस्थित होते. 


मदर तेरेसा यांच्या 19 व्या पुण्यतिथीच्या एक दिवस आधी त्यांना हे संतपद बहाल करण्यात आलंय. या सोहळ्याला एक लाखाहून अधिक नागरिक उपस्थित होते. 


मदर तेरेसा यांना त्यांच्या जीवनात मिळालेल्या लोकप्रियतेमुळे संतपद बहाल करण्याचा निर्णय पूर्वीच घेण्यात आला होता. पूर्वीचे पोप जॉन पॉल दुसरे यांनी तेरेसा यांना संतपद बहाल करण्याच्या प्रक्रियेला वेग आणला होता. तेरेसा यांनी स्थापन केलेल्या मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेचे काम सध्या 133 देशांमध्ये चालते.