बर्लिन : जर्मनीतील म्युनिच शहरातील एका शॉपिंग सेंटरमध्ये एका हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केला. यात १० ठार झाल्याचे वृत्त आहे. तर हल्लेखोराने स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्या. यात तो ठार झाला. या हल्ल्यात १० हून अधिक लोक जखमी झालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. हल्ला करणारे हल्लेखोर हे जर्मन किंवा इराणी असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे, असे वृत्त एएफपीने दिले आहे. 


हल्ला झाल्यानंतर काही वेळातच जर्मन पोलिसांचे विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले. शॉपिंग सेंटरमध्ये मोठी कारवाई सुरू असल्याचे सांगून पोलिसांनी लोकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, या हल्ल्यात हल्लेखोरासह १० जण ठार झालेत तर १० हून अधिक लोक जखमी झालेत.



हल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी शॉपिंग मॉलला वेढा दिला  आणि संपूर्ण परिसर आणि रस्ता रिकामा केला. हल्यानंतर लोक भीतीने सैरावैरा पळत होते. सुरक्षा दलांची कारवाई सुरू असल्यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक थांबविण्यात आली. 
 
दरम्यान, जर्मनीतील सर्व भारतीय सुखरुप असल्याची माहिती भारतीय दूतावासाकडून देण्यात आली आहे. जर्मनीतील भारतीय नागरिकांची माहिती जाणून घेण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आले आहेत.  01712885973, 015123595006, 01754000667