ढाका : नुकतीच व्हिसा प्रकरणी अडचणीत आलेली आणि नॅशनल जिओग्राफिक चॅनलनं 'अफगाण गर्ल' शरबत गुला लवकरच भारतात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात मोफत ओषधोपचार मिळवण्यासाठी शरबत भारतात दाखल होणार आहे. अफगाणिस्तानचे भारतातील राजदूत शाईदा अब्दाली यांनी याबद्दल ट्विटरवरून माहिती दिलीय. शरबतला मोफत औषधोपचारासाठी त्यांनी भारताचे आभारही यावेळी मानलेत. तसंच भारताचा उल्लेख त्यांनी 'सच्चा मित्र' म्हणूनही केलाय. 


शरबतच्या वकीलांनी दिलेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय शरबत ध्या 'हेपेटायटिस सी' आजारानं त्रस्त आहे. बंगळुरूमध्ये तिच्यावर पुढील उपचार होणार आहेत. 


बनावट पाकिस्तानी ओळखपत्र धारण केल्याबद्दल पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी शरबतवर कारवाई केली होती... त्यानंतर गेल्या आठवड्यात ती काबुलला परतली होती.


नॅशनल जिओग्राफिक या जगप्रसिद्ध नियतकालिकाने 30 वर्षांपूर्वी आपल्या मुखपृष्ठावर शरबत गुलाचं छायाचित्र प्रकाशित केलं होते. सोव्हिएत संघानं कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानातून पाकिस्तानात आलेल्या लाखो निर्वासितांची ओळख ठरलेली हिरव्या भेदक डोळ्यांमुळे 'मोनालिसा ऑफ अफगाणिस्तान' म्हणून ती जगप्रसिद्ध झाली होती. स्टीव्ह मॅक्करी यांनी तिचं हे जगप्रसिद्ध छायाचित्र काढलं होते.