`व्हॅलेंटाईन डे` साजरा करण्याला हायकोर्टाची बंदी
पाकिस्तानातील न्यायालयानं व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास बंदी घातलीय.
इस्लामाबाद : पाकिस्तानातील न्यायालयानं व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास बंदी घातलीय.
कोर्टानंच आदेश दिल्यानंतर कायदेशीररित्या देशभरात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास आणि सोशल मीडियावर याला प्रोत्साहन देण्यास मज्जाव करण्यात आलाय.
अब्दुल वहीद नावाच्या एका व्यक्तीनं एका याचिका दाखल करत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात येऊ नये, अशा आशयाची याचिका कोर्टात दाखल केली होती.
'व्हॅलेंटाईन डे' साजरा करणं हा मुस्लिम परंपरेचा भाग नाही... त्यामुळे सोशल मीडिया आणि समाजात केल्या जाणाऱ्या सेलिब्रेशनवर बंदी घालण्यात यावी असं याचिकेत म्हटलं गेलं होतं.
पाकिस्तानच्या हायकोर्टानं ही याचिका स्वीकार करत प्रशासनाला व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात बंदी घालण्याचे आदेश दिले.