नवी दिल्ली : बनावट नोटांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला खूप मोठं नुकसान होतं होतं. पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात नकली नोटा या भारतात व्यवहारात आणल्या जातं होत्या. त्यामुळे मोदी सरकारने ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला. पण यानंतर पुन्हा नकली नोटा छापल्या जाणार नाही का असा प्रश्न उपस्थित केला जातोय.


गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांच्या माहितीनुसार आता पाकिस्तानातील डी कंपनी १०० रुपयाच्या नकली नोटा छापण्याची तयारी करत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार मागील ३ वर्षात मोठ्या प्रमाणात बनावट नोटा पाकिस्तानात छापल्या गेल्या. मोदींनी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे बनावट नोटा बनवणाऱ्या टोळींना मोठा फटका बसला आहे. पण यानंतर आता पाकिस्तानात १०० च्या बनावट नोटा छापण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय.