व्हिडिओ : चीन मानवी देहाच्या मांसाची निर्यात करतं?
सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत चीनमधल्या एका फॅक्टरीत मानवी देहावरचं मांस प्रक्रिया करून निर्यात केलं जात असल्याचा दावा करण्यात आलाय.
बीजिंग : सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत चीनमधल्या एका फॅक्टरीत मानवी देहावरचं मांस प्रक्रिया करून निर्यात केलं जात असल्याचा दावा करण्यात आलाय.
यंदाच्या वर्षीच्या सुरुवातीलाही अशा प्रकारच्या बातम्या समोर आल्या होत्या. झांबियामधल्या एका वर्तमानपत्रात अशाच प्रकारचा दावा करण्यात आला होता. या वर्तमानपत्रानुसार, चीनमध्ये राहणाऱ्या एका महिलेनं काही चायनीज कंपन्या मृत मानवी देह जमा करून त्यावर प्रक्रिया करून हे मांस विकलं जात असल्याचा दावा केला होता.
आफ्रिकन देशांमध्ये हे मांस निर्यात केलं जात असल्याचा दावा केला जातोय. चीननं मात्र या दाव्यांना साफ नाकारलंय... हे दावे म्हणजे 'बेजबाबदारपणा' असल्याचं चीनचे प्रवक्ते हाँग लाई यांनी म्हटलंय.