वॉशिंग्टन : अनेक महान व्यक्तीमत्वांनी आपल्या मृत्यूनंतर आपली संपूर्ण संपत्ती एखाद्या विधायक कार्यासाठी वापरावी, अशी त्यांच्या मृत्यूपत्रात तरतूद करुन ठेवल्याचे आपण ऐकलेच असेल. आल्फ्रेड नोबेल, पुलित्झर यांसारख्या व्यक्तीमत्वांच्या नावे तर त्यांनी दान केलेल्या संपत्तीच्या माध्यमातून ट्रस्ट स्थापन करुन पुरस्कार दिले जातात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण, एखादा कुप्रसिद्ध दहशतवादी आपल्या संपत्तीचे काय करेल, असा प्रश्न तुम्हाला पडलाय का? तर अमेरिकेने नुकतेच अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचे मृत्यूपत्र जारी केले आहे. त्याच्या मृत्यूपत्रानुसार त्याने आपली संपूर्ण संपत्ती जिहाद आणि पाश्चात्य राष्ट्रांविरुद्ध लढण्यासाठी दान करावी, असे म्हटले आहे. २०११ साली त्याचा खात्मा केल्यानंतर पाच वर्षांनी हे पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. 


सूदान देशात दाऊदचे २ कोटी ९० लाख डॉलर्स होते ज्याची आजच्या दरानुसार किंमत आहे २०० कोटी रुपये. यातील प्रत्येकी दोन लाख रुपये आपल्या बहिणींना देण्याचीही इच्छा त्याने यात व्यक्त केली आहे. पण, महत्त्वाची बाब म्हणजे हे पैसे आहेत तरी कुठे हे कोणालाच माहित नाही. 


२ मे २०११ साली अमेरिकेने पाकिस्तानातील अबोटाबाद येथे घुसून लादेनचा खात्मा केला तेव्हा त्याच्या घरात ही कागदपत्र अमेरिकी फौजांना सापडली होती.