पेशावर :   स्मार्ट फोन पेक्षा बंदुका स्वस्त मिळण्यासाठी पाकिस्तान प्रसिद्ध होत चालला आहे, .येथील आदिवासी भागात स्मार्ट फोन पेक्षा बंदुका स्वस्त आहेत. या भागातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची उघड विक्री होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील अनेक दशकापासून ही विक्री सुरू आहे, पेशावरपासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या दर्रा अदमखेल या गावामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे विकली जातात. 


दर्रा अदमखेलया गावात चोरीच्या वाहनांसह विद्यापीठाची बनावट पदव्याही अगदी सहज मिळतात. गुन्हेगारी हब म्हणूनच गावाची ओळख निर्माण झाली आहे. गावातील विविध रस्त्यांवर उघडपणे बंदुका, चाकू आणि स्फोटासाठी लागणाऱया वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या दिसतात. 


दरम्यान, पंतप्रधान नवाज शरीफ यांनी बाजारपेठ बंद करण्यासाठी पाऊल उचलले आहे. गावाच्या चारही बाजूंनी तपासणी नाके उभारले आहेत. यामुळे आर्थिक उलाढालीवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. 


खिताब गुल यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील  १० वर्षांमध्ये मी एकट्याने किमान १० हजार बंदुका विकल्या आहेत, यापैकी एकही तक्रार आलेली नाही.