इस्लामाबाद : पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक्स मीडिय़ा रेग्युलेटरी अथॉरिटी इंडियाने भारतीय न्यूज चॅनेल्सच्या प्रसारणावर बंदी आणली आहे. राजधानी इस्लामाबादमध्ये बुधवारी हा निर्णय घेण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानात २१ ऑक्टोबर रोजी, शुक्रवारी दुपारी भारतीय टीव्ही चॅनेल्सचं प्रसारण पूर्णपणे बंद होणार आहे.


या आधी पाकिस्तान सरकारने म्हटलं होतं की, ज्या प्रमाणे पाकिस्तानी टीव्ही चॅनेल्सवर भारतात बंदी आहे, त्याप्रमाणे पाकिस्तानातही भारतीय चॅनल्सवर बंदी आणली जाणार आहे. मात्र भारतात कोणत्याही पाकिस्तानी टीव्ही चॅनेल्सवर सरकारने बंदी आणलेली नाही. तसेच  इंटरनेटवर दोन्ही देशाचे चॅनेल्स प्रेक्षकांना दिसणार आहेत.