अमेरिकेने पाकिस्तानला पुन्हा एकदा दिला इशारा
अमेरिकेने दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला पुन्हा एकदा खडसावलं आहे. अमेरिकेने म्हटलं की, पाकिस्तानने त्यांच्या धरतीवर वाढत असणाऱ्या दहशतवादाविरोधात कारवाई करावी. यामुळे ते शांती प्रकियेत त्यांचं योगदान देऊ शकतील.
नवी दिल्ली : अमेरिकेने दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला पुन्हा एकदा खडसावलं आहे. अमेरिकेने म्हटलं की, पाकिस्तानने त्यांच्या धरतीवर वाढत असणाऱ्या दहशतवादाविरोधात कारवाई करावी. यामुळे ते शांती प्रकियेत त्यांचं योगदान देऊ शकतील.
चार दिवसांपूर्वी यूएसने पाकिस्तानला म्हटलं होतं की, जर ते दहशतवाद्यांविरोधात कारवाई करणार नाहीत तर युएस सर्जिकल स्ट्राईक करुन त्यांच्या देशातील दहशतवादी कॅम्प उद्धवस्त करतील.
स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी म्हटलं की, आम्हाला माहित आहे की त्या भागात पाकिस्तान सरळ शांती आणि स्थिरतेसाठी भाग घेऊ शकतात. यासाठी त्यांना दहशतवादाविरोधात कारवाई करावी लागेल. जे समोरच्या देशांवर हल्ले करतात.
यूएसच्या दहशतवाद इंटेलिजेंसच्या सचिवांनी म्हटलं होतं की, पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा दहशतवादाविरोधात कारवाई नाही करु इच्छित. पाकिस्तान सरकारमधील ताकद असणारी आयएसआय ही संस्था देशातील कोणत्याच दहशतवाद्यांविरोधात कारवाई नाही करु इच्छित. यामुळे आम्ही पाकिस्तानातील आमच्या सहयोगींना सांगत आहोत की त्यांनी पाकिस्तानातील दहशतवादाविरोधात पावलं उचलावी. अमेरिका त्यांना या कामात मदत करायला तयार आहे.'