सीमेवर पाकिस्तानचं सैन्य करतंय युद्ध सराव
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. यातच बातमी होती की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधरावे म्हणून पंतप्रधान नवाज शरीफ यांचे परराष्ट्र संबंधित प्रकरणांचे सल्लागार सरताज अजीज हे भारतात येणार आहेत. पण यातच आता दुसरी माहिती येते आहे की पाकिस्तानचं सैन्य सीमेवर मिलिट्री एक्सरसाइज करत आहे.
इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. यातच बातमी होती की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधरावे म्हणून पंतप्रधान नवाज शरीफ यांचे परराष्ट्र संबंधित प्रकरणांचे सल्लागार सरताज अजीज हे भारतात येणार आहेत. पण यातच आता दुसरी माहिती येते आहे की पाकिस्तानचं सैन्य सीमेवर मिलिट्री एक्सरसाइज करत आहे.
एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार नवाज शरीफ आणि आर्मी चीफ राहिल शरीफ स्वत: त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी पोहोचले. पाकिस्तान सरकारने हवाई दलाला कोणत्याही परिस्थितीत तयार राहण्यास सांगितलं आहे.
बहावलपूरमध्ये सुरु आहे सराव
पाकिस्तानचं सैन्य सराव करत असतांना या दरम्यान नवाज शरीफ तेथे पोहोचले. हॅलिकॉप्टर आणि सैन्य यांचा सराव सुरु आहे. हा सराव यासाठी आहे की त्यांना दाखवायचं आहे की पाकिस्तान सैन्य कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आहे.