नवी दिल्ली : भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन दहशतवाद्यांचा तळ उद्धवस्त केला. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तानचा चांगलाच तीळपापड झाला आहे. या सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्याची तयारी पाकिस्तानकडून होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानच्या लष्करानं त्यांच्या चौक्यांवर स्पेशल स्ट्रायकर आणि दहशतवाद्यांमधले शार्प शूटर तैनात केल्याची माहिती आहे. या दहशतवाद्यांकडे अडीच किलोमीटरपर्यंत मारक क्षमता असलेली स्नायपर रायफल आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या आणि मोठं नुकसान करणाऱ्या तोफा असल्याचंही बोललं जात आहे.


संधी मिळाली तर भारताच्या चौक्यांवर हल्ला करण्याचे आदेशही या दहशतवाद्यांना देण्यात आले आहेत, असंही सूत्रांनी सांगितलं आहे.