१०० मुलांचा पिता बनण्याचे आहे त्याचे स्वप्न
सध्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता कुटुंब नियोजन म्हणून पती-पत्नी एक अथवा दोन मुलांचा विचार करतात. मात्र पाकिस्तानमधील एका व्यक्तीला १०० मुलांचा पिता व्हायचेय.
इस्लामबाद : सध्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता कुटुंब नियोजन म्हणून पती-पत्नी एक अथवा दोन मुलांचा विचार करतात. मात्र पाकिस्तानमधील एका व्यक्तीला १०० मुलांचा पिता व्हायचेय.
याआधी झालीत तीन लग्ने
हा व्यक्ती आता चौथे लग्न करतोय. १०० मुलांचा पिता बनण्याचे त्याचे लक्ष्य आहे. याआधी त्याची तीन लग्ने झाली असून त्याला ३५ मुले आहेत. सरदार जान मोहम्मद खिलजी असं या व्यक्तीचे नाव असून ते ४६ वर्षांचे आहेत.
सरदार जान मोहम्मद खिलजी यांच्यामते अधिकाधिक मुलांना जन्माला घालणे हा त्यांचा धर्म आहे. ते पेशाने मेडिकल टेक्निशियन आहेत.
१०० मुलांचा पिता होण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी ते चौथ्यांदा बोहल्यावर चढणार आहेत. त्याच्या आधीच्या तीनही पत्नी एकत्र मिळून मिसळून राहतात, असं खिलजी यांचं म्हणणं आहे.