नवी दिल्ली : पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधील भागात कोटली येथे पाकिस्तानची आर्मी आणि गुप्तचर यंत्रणा आयएसआय विरोधात पीओकेमधील लोकं रस्त्यावर उतरले आहेत. नवाज शरीफ सरकारविरोधात लोकांनी घोषणाबाजी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुजफ्फराबाद, गिलगिट, कोटलीसह पीओकेमधील दुसऱ्या भागांमध्ये पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी झाली. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी काश्मीरच्या मुद्द्यावर म्हटलं की, पीओके देखील भारताचाच भाग आहे.


कोटलीमधील स्थानिक लोकांनी ऑल पार्टीज नॅशनल अलायंस (एपीएनए) के चेअरमेन आरिफ शाहिद यांच्या हत्येच्या स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. शाहिद यांची 14 मे 2013 मध्ये रावलपिंडीमधील त्यांच्या घरात गोळी मारुन हत्या करण्यात आली. लोकांचं म्हणणं आहे की त्यांची हत्या आयएसआयने केली आहे. ४ वर्षानंतर ही यावर कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही.


मुजफ्फराबादमधील बेस्ड ऑल इंडिया नॅशनल अलायंसनुसार, मागील दोन वर्षात आयएसआयने 100 हून अधिक वर्कर्सची हत्या केली आहे.