नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवार सौदी अरबचे राजा सलमान बिन अब्दुल अजीज यांची भेट घेतली. या भेटीमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. सौदी अरबसोबत संबधांना गती देण्यासाठी दोघांमध्ये व्यापार, गुंतवणूक वाढवणे आणि दहशदवादासोबत सामना करण्याच्या विषयावर चर्चा झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदींनी या भेटीत सौदी अरबच्या राजाला एक खास भेट देखील दिली. केरळमध्ये असणाऱ्या चेरामन जुमा मस्जिदीची एक गोल्ड प्लेटेट प्रतिकृती भेट म्हणून दिली. मुगल व्यापारी जेव्हा भारतात आले होते तेव्हा इसवी सन ६२९ मध्ये ही पहिली मस्जिद बनवली गेली होती.


.