वॉशिंग्टन : अमेरिकेचे सद्य राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा स्पेशल ब्लॅकबेरी फोन हा नेहमीच चर्चेचा विषय ठरलाय... पण, आता याच ब्लॅकबेरी फोनचा त्याग बराक ओबामा करणार आहेत. 


ब्लॅकबेरीच्या ऐवजी नवीन यंत्र... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका टीव्ही चॅनलशी बोलताना बराक ओबामा यांनी 'आता आपल्याला एकदम नवीन यंत्र देण्यात आलंय... परंतु, सुरक्षेच्या कारणास्तव अद्याप ते वापरासाठी काढलेलं नाही' असं म्हटलंय. या यंत्राचं नाव मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. 


या यंत्रानं आपण सध्या तरी फोन करू शकत नाही, मॅसेज पाठवू शकत नाही किंवा फोटोही काढू शकत नाही... सध्या तरी तो एखाद्या लहान मुलाच्या खेळण्याप्रमाणेच आहे, असं ओबामांनी म्हटलंय. 


ब्लॅकबेरी झाला जुना...


या ब्लॅकबेरीचा वापर बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष बनण्याच्या आधीपासून करत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीनं २००८ साली ओबामांसाठी अतिरिक्त सुरक्षा असलेल्या ब्लॅकबेरीची व्यवस्था केली होती. यामध्ये सिक्युअर व्हॉईस नावाचं एका सुरक्षा सॉफ्टवेअर होतं. 


या फोनचं वैशिष्ट्यं म्हणजे यात केवळ १० विशिष्ट लोकांनाच फोन करता येणं शक्य होतं. या फोनमध्ये सेल्फीसाठी कॅमेरा किंवा मॅसेज पाठवण्याची सुविधा नव्हती.