इस्लामाबाद : क्रिकेटमध्ये पाकिस्तान टीमने टीम इंडियाला हरवलं, तर मी कपडे काढून डान्स करेन, असं म्हणणारी पाकिस्तानची अभिनेत्री आणि मॉडेल कंदील बलोच सोशल मीडियात जोरदार चर्चेत आली आहे.


कंदील बलोचने मौलवीचे लाईट लावले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंदील बलोचने एका मुस्लिम धर्मगुरूला चांगलंच अडचणीत आणलं आहे. बलोचने मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती अब्दुल कवी सोबत सेल्फी काढला, हा सेल्फी तिने सोशल मीडियावर - टवीटर, फेसबुक पेजवर शेअर केला. 


"मौलवी साहब आप भी"


आपल्या सेक्सी अदांमुळे चर्चेत आलेल्या कंदील बलोचने धर्मगुरू मुफ्ती अब्दुल कवी यांच्यासोबतचा सेल्फी आणि व्हिडीओ फेसबुक पेजवर शेअर केला, आणि पाकिस्तानात चर्चेला उधाण आलं आहे. यावरून"मौलवी साहब आप भी", असं मौलवी मुफ्ती यांना लोक म्हणायला लागलेत.


कुणी कुणाला टोपी लावली?


सध्या रमजान सुरू असल्याने बलोच आणि अब्दुल कवी हे इफ्तार दरम्यान एका हॉटेलात भेटले. कंदीलने मौलवीसोबत सेल्फी काढला. कंदील आणि मौलवी फारच जवळ बसलेले आहेत, एवढंच नाही कंदील सेल्फीत मौलवीची टोपी घालून बसलीय आणि सेल्फीचा आनंद घेतेयं.


कंदीलने मीडियाला दिली धक्कादायक माहिती


कंदीलने मीडियाला सांगितलं, मुफ्तींची मला हॉटेलमध्ये भेटण्याची इच्छा होती, ते भेटले आणि त्यांनी त्यांचं माझ्यावरचं प्रेम व्यक्त केलं.


कहाणी में टवीस्ट


कंदीलच्या जाळ्यात अडकलेले मुफ्ती अब्दुल म्हणतात, हे काही खरं नाही, कहाणी जरा वेगळी आहे. मौलवी म्हणतात कंदीललाच मला भेटायचं होतं आणि तिच्यासाठी तिला दुआ मागायची होती. तसेच कंदीलने त्यांच्याकडे विनंती केली आहे की, कंदीलची राजकीय नेते आणि क्रिकेटरशी भेट घडवून आणावी. जिओ टीव्हीशी बोलताना मौलवी म्हणाले, मी रमजाननंतर इमरानशी याविषयी बोलतो, असंही मी कंदीलला सांगितलंय.


मौलवी म्हणाले, माझी तुझी जोडी छान जमेल


मात्र कंदीलने याबाबतील एका न्यूज चॅनेलला सांगितलं, मी जेव्हा इमरानचं नाव घेतलं, तेव्हा मुफ्ती साहेब म्हणाले, इमरानचं सोडं, तो ६५ वर्षांचा म्हातारा झालाय, मी फक्त ५० चा आहे, आणि तू पंचवीसची. माझी आणि तुझी जोडी छान जमेल.


टोपीवर मौलवी म्हणाले...


मी फोनवर बोलत होतो, तेव्हा कंदीलने माझी टोपी गुपचूप उचलली आणि फोटो काढले.


यापूर्वीही कंदील चर्चेत


सोशल मीडियावर इमरान खान आणि टीम इंडियाचा क्रिकेटर विराट कोहली यांच्याविषयी देखील कंदीलने जाहीर प्रेम व्यक्त केलं आहे.


कंदीलची इच्छा अपूर्णच...


या वर्षी मार्चमध्ये क्रिकेट वर्ल्ड कप टी-२० टुर्नामेंट दरम्यान कंदीलने जाहीर केलं होतं, जर पाकिस्तान टीमने टीम इंडियाला हरवलं, तर ती स्ट्रिप डान्स म्हणजेच कपडे उतरवून डान्स करेल, मात्र टीम इंडियाने पाकिस्तानला हरवल्याने, कंदीलची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.