आरोपीकडून कंदील बलोचच्या हत्येची कबुली
पाकिस्तानातील पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार कंदील बलोच हत्या प्रकरणी तिच्या भावाला अटक करण्यात आली आहे.
कराची : पाकिस्तानातील पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार कंदील बलोच हत्या प्रकरणी तिच्या भावाला अटक करण्यात आली आहे. आपण कंदील बलोचची गळा दाबून हत्या केल्याची कबुलीही तिच्या भावाने पोलिसांना दिली आहे.
कंदीलचा भाऊ वसीने पत्रकार परिषदेत आपण शनिवारी घरी कंदील बलोचची गळा दाबून हत्या केल्याचं त्याने म्हटलं आहे.
वसीनने कंदीलला आपलं हाय-प्रोफाईल मॉडेलिंग करिअर सोडण्यास सांगितलं होतं, पण कंदीलने हे मान्य केलं नसल्याने, कंदीलची हत्या करण्यात आली.
कंदील बलोच आपल्या बेधडक आणि बोल्ड अंदाज आणि फोटो-व्हिडीओमुळे सोशल मीडियावर प्रसिद्धीस आली होती.
सोशल मीडियावर कंदीलच्या चाहत्यांची मोठी संख्या होती, मात्र पाकिस्तानातील परंपरावादी लोकांनी तिच्यावर टीकास्त्र सोडलं होतं.
कंदीलने एका धर्मगुरूसोबत फोटो काढून त्या धर्मगुरूची पोलखोल केली होती.