८४व्या वर्षी हे मीडिया सम्राट चौथ्यांदा अडकले लग्नाच्या बेडीत
लंडन : जागतिक माध्यम सम्राट रुपर्ट मरडॉक यांनी लंडन येथे एका औपचारिक सोहळ्यात मॉडेल आणि अभिनेत्री असणाऱ्या जेरी हॉल हिच्याशी विवाह केला आहे.
लंडन : जागतिक माध्यम सम्राट रुपर्ट मरडॉक यांनी लंडन येथे एका औपचारिक सोहळ्यात मॉडेल आणि अभिनेत्री असणाऱ्या जेरी हॉल हिच्याशी विवाह केला आहे. तो ही ८४ वर्षी.
जागतिक कंपनी 'न्यूज कॉर्प' आणि ब्रिटनमधील 'द टाइम्स' आणि 'द सन' या वृत्तपत्रांचे प्रकाशक असणारे मरडॉक सध्या ८४ वर्षांचे आहेत. तर त्यांच्या पत्नी जेरी हॉल सध्या ५९ वर्षांच्या आहेत.
आज म्हणजे शनिवारी ते लंडनमधल्या फ्लीट स्ट्रीटवरील सेंट ब्राइड्स चर्चमध्ये या त्यांच्या विवाहाची औपचारिक गाठ बांधली. त्यानंतर एका छोटेखानी समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चच्या आजूबाजूला विविध वृत्तपत्रांची कार्यालये असल्याने या चर्चला 'पत्रकारांचे चर्च' म्हणण्याचीही परंपरा आहे.
या दाम्पत्याला सध्या सहा मुली आहेत. यातील चार मुली मरडॉक यांच्या असून दोन जेरी यांच्या आहेत. मरडॉक आणि जेरी यांची भेट वर्षापूर्वी झाली होती. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी साखरपुड्याची घोषणा केली होती. मरडॉक यांचा हा चौथा विवाह असून जेरी हॉल यांचा दुसरा विवाह आहे.