नवी दिल्ली :  फॉर्मुला कार रेसिंग तुम्ही टीव्हीवर पाहिली असेल गाड्यांचा वेग हवेशी स्पर्धा करतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलेशियातील एक महिला मोटरस्पोर्ट एथलीट लियोना चीनला मित्सुबिशी मोटर कंपनीने कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना टेस्ट ड्राइव्हचा अनुभव देण्यासाठी सेल्स गर्ल ठेवले. लिओनाने आनंदाने हा प्रस्ताव मंजुर केला. 




ग्राहक आले आणि त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या लियोनाकडून काही लक्झरी गाड्यांची माहिती घेतली त्यानंतर टेस्ट ड्राइव्ह विचारले.


ग्राहकांनी प्रथम ही कार स्वतः चालवली. नंतर लियोनाने स्टेरिंग हातात घेऊन  कार खरेदी करण्यास आलेल्या ग्राहकांला जोर का झटका दिला. त्यांना वाटले नव्हते की ती इतक्या फास्ट गाडी चालवू शकेल.


अनेकांची भंबेरी उडाली. अनेकांनी तिला गाडी थांबविण्याची विनंती केली, अनेक जण घाबरले.