नवी दिल्ली :  सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. कॅनडातील हा व्हिडिओ असून शरिराचा थरकाप उडविणारा हा व्हिडिओ आहे. या  व्हिडिओ एक मुलगी किनाऱ्यावर बसली होती. तेव्हा समुद्र सिंह आला आणि त्याने जबड्यात तिला पकडले आणि पाण्यात घेऊन गेला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


द वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या बातमीनुसार कॅनडाच्या पश्चिम किनाऱ्यावर लोक समुद्रातील जीवांना काही खाण्याच्या वस्तू देत होते. तसेच त्यांच्या हालचालींचा मजा घेत आहे. त्यावेळी तेथे असलेले समुद्र सिंह लोकांनी दिलेल्या वस्तू उड्या मारून खात होते. त्याच वेळी एक मुलगी समुद्र किनाऱ्यावर बसली होती. तेव्हा अचानक समुद्रातून बाहेर येऊन एका Sea lion ने मुलीकडे झेप घेतली आणि तिला आपल्या जबड्यात पकडले. हे दृश्य पाहून अनेकांची आरडाओरडा सुरू केला. 


 



या ठिकाणी उपस्थित असलेले सुन्न झाले. एक क्षणापूर्वी ही मुलगी Sea lion ला पाहून खुश होती, पण दुसऱ्या क्षणाला तिला त्याच्या हल्ल्याला सामोरे जावे लागले. त्यानंतर एका व्यक्तीने समुद्रात उडी घेऊन Sea Lionच्या तावडीतून त्या मुलीची सुटका करून तिला सुखरूप बाहेर आणले. चित्त्याच्या चपळाईने या व्यक्तीने तिची सुटका करून आणली....


फुजीवारा याने २० मे रोजी आपल्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ अपलोड केला. त्याला आत्तापर्यंत ५५ लाख ५९ हजार ११२ पेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे.