लग्नातील केकच्या एका तुकड्याची किंमत 1,500 पाउंड
महाराणी विक्टोरिया आणि राजकुमार एल्बर्टच्या लग्नातील केकचा एक तुकडा 1,500 पाउंड मध्ये विकला गेलाय
मुंबई: महाराणी विक्टोरिया आणि राजकुमार एल्बर्टच्या लग्नातील केकचा एक तुकडा 1,500 पाउंड मध्ये विकला गेलाय. 19 व्या शतकाचा या केकच्या तुकड्याचा लिलाव क्रिस्टीज कंपनीने लंडनमध्ये केला आहे.
1840 मध्ये महाराणी विक्टोरिया आणि राजकुमार एल्बर्टचं लग्न झाल होतं. त्या समारंभासाठी हा केक तयार केला गेला होता. संग्रहक गॅसवरो रॉबट्सने या केकचा तुकडा 1,500 पाउंडला विकला आहे.
यादरम्यान गॅसवरो रॉबट्सच्या संग्रहातील अनेक वस्तूचा लिलाव झाला असून, महाराणी विक्टोरियाचे अंत:वस्त्र या लिलावात 16,250 पाउंडमध्ये विकले गेले.