नवी दिल्ली : भारतामध्ये सोशल मीडियाचा वापर अधिक होत आहे. त्यामध्ये स्नॅपचॅटचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतू स्नॅपचॅटचा भारतात बिझनेस वाढविण्याचा विचार नाही. स्नॅपचॅटचे सीईओ इवान स्पीगल यांचे म्हणणे आहे की, 'बिझनेस वाढविण्याच्या दृष्टीने भारत हा खूपच गरीब देश आहे. त्यामुळे भारतात बिझनेस वाढविण्याचा आमचा विचार नाही.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हरायटीमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार 'ग्रोथ ऑफ अॅप्स यूजर बेस इन'च्या झालेल्या बैठकीत इवान स्पीगल यांनी हे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर भारतीय स्नॅपचॅट युर्जस सोशल मीडियाद्वारे इवान स्पीगलविरोधी प्रतिक्रिया देत आहेत.


या वादग्रस्त वक्तव्यामुळे कंपनीचे मोठे नुकसान होत आहे. या वक्तव्यामुळे स्नॅपचॅटचे रेटिंग घसरत  आहे. अॅप स्टोरमध्ये स्नॅपचॅटचे रेटिंग पाच स्टारवरुन एका स्टारवर घसरले आहे.