रोम : एका विद्यार्थीनीला भर रस्त्यात जिवंत जाळल्याची घटना घडलीय. धक्कादायक म्हणजे, हे सर्व घडत असताना आजुबाजुच्या लोकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोममध्ये ही घटना घडलीय. सारा दी पित्रांटोनियो असं या पीडीत मुलीचं नाव आहे. ती केवळ २२ वर्षांची होती. या घटनेत पीडित मुलीचा मृत्यू झालाय. 


बॉयफ्रेडनंच जाळलं


बॉयफ्रेडशी नात तोडल्यानंतर त्यानंच साराला गाडीत जिवंत जाळल्याचं पोलिसांनी म्हटलंय. रविवारी ही घटना घडलीय. सारानं २७ वर्षीय विन्सेन्झो पाडॉनो याला नाकारल्याचा राग त्याच्या मनात होता. विन्सेन्झो यानं पहिल्यांदा सारा हिला जबरदस्तीनं मद्य प्यायला भाग पाडलं. त्यानंतर हेच अल्कोहल गाडीवरही टाकून साराला त्यानं कारसहीत लायटरच्या मदतीनं पेटवून दिलं. 


...पण 'त्यांनी' फक्त पाहिलं


रात्री ३ वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. तेव्हा या रोडवरून काही गाड्याही जाताना दिसल्यात. पण, कुणीही बचावासाठी आरडाओरड करणाऱ्या साराच्या मदतीसाठी थांबलं नाही. जर साराला वेळीच मदत मिळाली असती तर ती वाचली असती, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.