मुंबई : रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी हायस्पीड ट्रेनमधून १५० किमीचा प्रवास केवळ ४५ मिनिटांत केला. तोही चालकाच्या केबिनमध्ये बसून. 


३००च्या वेगाने प्रवास


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरेश प्रभू यांनी फान्सच्या दौऱ्याच्यावेळी हायस्पीड रेल्वे टीजीव्हीतून प्रवास केला. ही रेल्वे तासी ३२० किलोमीटर वेगाने धावते.


चालकाच्या केबिनमधून प्रवास


प्रभू यांनी फ्रान्सच्या एका वरिष्ठ रेल्वे  अधिकाऱ्यांकडून या हायस्पीड रेल्वेची माहिती जाणून घेतली. तसेच सुरक्षा संदर्भात अनेक उपाय योजनाही चालकाच्या केबिनमधून अत्याधुनिक उपकरणांच्या माध्यमातन जाणून घेतल्या. सुरेश प्रभू यांना १२ एप्रिलला रिम्स स्टेशनही दाखविण्यात आले आणि त्याची माहिती देण्यात आली.


फ्रान्स करणार मदत


भारतीय रेल्वे नवी दिल्ली ते चंदीगड दरम्यान सेमी हायस्पीड रेल्वे सुरु करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी फ्रान्सची मदत घेत आहे. फ्रान्स अंबाला आणि जालंधर स्टेशन अत्याधुनिक बनविण्यासाठी भारतीय रेल्वेला मदत करत आहे. दरम्यान, दिल्ली - आग्रा अशी हायस्पीड रेल्वेला सुरेश प्रभूंना हिरवा कंदील दाखला होता.