नवी दिल्ली : भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आज संध्याकाळी 7:30 वाजता यूएनमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचं खोटारडेणा जगासमोर आणणार आहेत. केरळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाने हे साफ झालं की सरकार दहशदवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला असंच सोडणार नाही आहे. यामुळेच सुषमा स्वराज या यूएनमध्ये जोरदार भाषण करतील असं म्हटलं जातंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुषमा स्वराज यांच्या यूएनमध्ये होणाऱ्या भाषणात पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना मिळणारी मदत, दहशतवादी बुरहान वाणी आणि बलूचिस्तानमध्ये मानव अधिकारांवर होणारे अत्याचार हे प्रमुख मुद्दे असणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार संयुक्त राष्ट्र महासभेत जम्मू-कश्मीरमधील उरी हल्ला, काश्मीरमधील हिंसेमागे असणारा पाकिस्तानचा हात, हाफिज सईद, सलाहुद्दीन यांना पाकिस्तानकडून मिळणारी मदत हे मुद्दे सुषमा स्वराज या जगासमोर मांडणार आहेत. सोबतच पठानकोट आणि उरीमधील हल्ल्यामागे पाकिस्तानचा कसा हात होता या संबंधीत पुरावे देखील त्या जगासमोर आणणार आहेत.


यूएनमध्ये तीन दिवसापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काश्मीरच्या मुद्दयावर भारताला घेरण्याचा प्रयत्न केला. बुरहान वाणीला युवा नेता सांगून देशातील युवकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न शरीफ यांनी केला. भारताने पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करावं अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता सुषमा स्वराज यांच्या युएनमधल्या भाषणाकडे पाकिस्तानसह संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.