नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. यामध्ये मात्र भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मात्र दोन्ही देशातील लोकांचं मन जिंकलं आहे. सुषमा स्वराज यांचं एका पाकिस्तानी यूथ डेलिगेशनने कौतूक केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२७ सप्टेंबरला चंडीगडमध्ये झालेल्या ग्लोबल यूथ पीस फेस्टिवलमध्ये भाग घेण्यासाठी पाकिस्तानमधून १९ प्रतिनिधी आले होते. भारतीय सेनेने एलओसीमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर मात्र त्यांच्या सुरक्षेवर पाकिस्तान आणि त्यांच्या कुटुंबियांकडून चिंता व्यक्त होऊ लागली. 


भारतात गर्ल्स फॉर पीस ग्रुपच्या पाकिस्तानी मुलींना लगेचच सुरक्षा पुरवण्यात आली. मुलींना पाकिस्तानात पुन्हा बोलवण्यासाठी दबाव येत होता. १ ऑक्टोबरला अलिया हरिर ज्या अगाज ए दोस्ती पीस फोरमच्या सदस्य आहेत त्यांनी सुषमा स्वराज यांच्यासोबत चर्चा केली आणि सुषमा स्वराज यांनी त्यांना सुरक्षित परत पाठवण्याचं आश्वासन दिलं. 


अलिया यांच्या ट्विटला उत्तर देतांना सुषमा स्वराज यांनी सगळ्यांचच मन जिंकलं. त्यांनी म्हटलं की, मुली सगळ्यांसाठी सामान्य असतात त्या कोणत्याही सीमेमध्ये बांधलेल्या नसतात.


२ ऑक्टोबरला हरिरने ट्विट केलं की, 'ट्रॉय यूनिवर्सिटीमधील आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यास करणाऱ्या एका विद्यार्थ्यांनी म्हटलं की, भारतीय त्यांच्या पाहुण्यांना देव मानतात.'