फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ल्यात ७५ ठार
फ्रान्सच्या नीस शहरामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 75 हून अधिक नागरिकांचा बळी गेलाय. दहशतवाद्यानं बेस्टिल शहरात आतषबाजी बघायला आलेल्या हजारो लोकांच्या गर्दीत एक भरधाव ट्रक घुसवून लोकांना चिरडलं. त्याचप्रमाणे हल्लेखोरानं गर्दीवर गोळीबारही केला.
पॅरिस : फ्रान्सच्या नीस शहरामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 75 हून अधिक नागरिकांचा बळी गेलाय. दहशतवाद्यानं बेस्टिल शहरात आतषबाजी बघायला आलेल्या हजारो लोकांच्या गर्दीत एक भरधाव ट्रक घुसवून लोकांना चिरडलं. त्याचप्रमाणे हल्लेखोरानं गर्दीवर गोळीबारही केला.
पोलिसांनी तात्काळ दहशतवाद्याला गोळ्या घालून संपवलं. पण तोपर्यंत त्यानं 70 हून अधिक लोकांचे प्राण घेतले होते. तर 100हून अधिक नागरिक जखमी आहेत. हल्ल्यानंतर ट्रकमधून बंदूका आणि हातबॉम्बही जप्त करण्यात आले.
फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्वा ओलांद यांनी या हल्लानंतर तातडीची बैठक बोलावलीय. फ्रान्सवर झालेल्या या क्रूर हल्ल्याचा जगभरातून निषेध होतोय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ओलांद यांना फोन करून हल्ल्याची पूर्ण माहिती घेतलीय. त्याचप्रमाणे हा हल्ला अत्यंत गंभीर आणि दुःखदायक असल्याचं म्हटलंय.
फ्रान्समध्ये गेल्या आठ महिन्यात वारंवार झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 130 जणांचा बळी गेलाय. काल रात्री झालेल्या हल्ल्याची जबाबदारीही आयसिसनं घेतली. नोव्हेंबर महिन्यात पॅरिसच्या फुटबॉल स्टेडियमवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.