व्हिडिओ : ब्रिटन संसदेजवळ दहशतवादी हल्ला, हल्लेखोर ठार
ब्रिटन संसदेजवळ दहशतवादी हल्ला झालाय. हाऊस ऑउफ कॉमन्स नेता डेविड लिडिंगटन यांच्या म्हणण्यानुसार, ब्रिटन संसदेत एका पोलीस अधिकाऱ्याला चाकू मारण्यात आला. पोलिसांनी मात्र हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलंय.
नवी दिल्ली : ब्रिटन संसदेजवळ दहशतवादी हल्ला झालाय. हाऊस ऑउफ कॉमन्स नेता डेविड लिडिंगटन यांच्या म्हणण्यानुसार, ब्रिटन संसदेत एका पोलीस अधिकाऱ्याला चाकू मारण्यात आला. पोलिसांनी मात्र हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलंय.
दरम्यान, पोलिसांना हल्लेखोराला ठार करण्यात यश मिळालंय. संसदेची इमारत सील करण्यात आलीय. रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 12 लोक या घटनेत जखमी झालेत. वेस्टमिंस्टर पॅलेसही बंद करण्यात आलंय.
संसदेच्या आत अडकलेल्या स्टाफला बाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आलेत. संसदेतील उपस्थितांना 3-4 गोळ्यांचे आवाजही ऐकायला मिळालेत.
गोळाबाराच्या आवाजानंतर स्कॉटलँड यार्डला अलर्ट करण्यात आलं.... त्यानंतर सुरक्षा दलानं हल्लेखोराला मोठ्या प्रयत्नानंतर ठार केलं.
आत्तापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.