नवी दिल्ली :  साधारणपणे न्यूज अँकरला आपण धीरगंभीर अंदाजात पाहतो. पण अँकरकडूनही ऑन एअर काही अशा चुका होतात की त्यामुळे सर्वांना हसू येऊ शकते. अशी काहीशी घटना ऑस्ट्रेलियाच्या एबीसी २४ या चॅनलची अँकर नताशा एक्सेलिबी हिच्यासोबत घडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूज अँकरचे काम सोपे नाही. बातम्या वाचताना अनेकवेळा चुका होतात. बुलेटीनमध्ये आणि ब्रेकमध्ये आणि बुलेटीन सुरू होताना मजा-मस्करीच्या मूडमध्ये असतात किंवा कोणी रिलॅक्स असतात. पण न्यूज सुरू झाल्यावर अँकर गंभीर होता. असा एक व्हिडिओ नताशाचा व्हायरल होत आहे. 


ऑस्ट्रेलियाच्या एबीसी २४ या चॅनलची अँकर नताशा बातम्या वाचत होती. बातम्या सुरू असताना काही व्हिज्युअल्स दाखविण्यात आले. तेव्हा ती हातातील पेनासह विचारमग्न होती. अचानक तिच्यावर कॅमरा आला आणि पाहा काय होती तिची रिअॅक्शन... 


 



नताशाबाबत असे पहिल्यांदा झाले नाही.. यापूर्वीही असाच किस्सा तिच्या बाबतीत घडला होता. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. २०१३ मध्ये एका गंभीर बातमीवेळी ती हसली होती. त्यानंतर तिची खूप अलोचना झाली होती. तीने या प्रकरणाची माफी मागितली होती.