बीजिंग : आयफोनची क्रेझ जगभरात आहे. मात्र या क्रेझपायी चीनमध्ये एका जोडप्याने आपल्या १८ महिन्यांच्या मुलीला विकल्याची धक्कादायक घटना घडलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयफोन विकत घेण्यासाठी या जोडप्याने आपल्या मुलीला तब्बल ३५३० अमेरिकन डॉलरला विकले. याप्रकरणी या जोडप्याला तीन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलीये. 


चीनच्या फुजियान प्रांतात राहणाऱ्या दुआन या बापाने एका साईटवर आपल्या मुलीची बोली लावली. खरेदी करणाऱ्या व्यक्तीने ३५३० अमेरिकन डॉलर इतकी रक्कम देत या मुलीला खरेदी केले. 


या घटनेची माहिती मिळाल्यानंतर या जोडप्याला ताब्यात घेण्यात आले. दुआन मुलीला विकून मिळालेल्या पैशातून आयफोन आणि मोटारसायकल विकत घेणार होता. मुलीची आई जिओ ही छोटी मोठी कामे करत असे. त्यांची आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती त्यामुळे या मुलीच्या पोषण कऱण्यात असमर्थ असल्याने हा निर्णय घेतल्याचे या जोडप्याचे म्हणणे आहे.