ब्रिटनमध्ये 3 पालकांच्या बाळाचा जन्म शक्य
मातृत्वाच्या गुणसुत्रामध्ये दोष असेल तर तो अपत्यामध्ये येण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीचं गुणसूत्र वापरण्याची ही पद्धत आहे.
लंडन : ब्रिटनमध्ये आता तीन पालकांच्या बाळाचा जन्म शक्य होणार आहे. इन व्हिट्रो फर्टिलायझेशन, म्हणजे कृत्रिम गर्भधारणा करताना पालकांव्यतिरिक्त तिसऱ्या व्यक्तीचा DNA वापरण्यास ब्रिटनमध्ये कायदेशीर मान्यता मिळाली आहे, अशा प्रकारे कायदा करणारा ब्रिटन हा जगातला पहिलाच देश ठरला आहे.
मातृत्वाच्या गुणसुत्रामध्ये दोष असेल तर तो अपत्यामध्ये येण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीचं गुणसूत्र वापरण्याची ही पद्धत आहे.
संसदेनं फेब्रुवारीमध्ये याबाबतचा कायदा संमत केला होता. त्यानंतर आज ह्युमन फर्टिलायझेशन अँड एम्ब्रियोलॉजी अॅथॉरिटीच्या अध्यक्षा सॅली चेशियर यांनी याला मान्यता दिलीये. मात्र कोणत्याही रुग्णालयाला ही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी अॅथॉरिटीची परवानगी घेणं बंधनकारक असेल.