वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रंप अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. प्रचारादरम्यान ट्रंप यांनी पीएम मोदींची नीती आणि भारताचं कौतूक केलं होतं. दहशतवादाच्या विरोधात त्यांची निती खूप साफ असेल. डोनाल्ड ट्रंप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर भारत आणि अमेरिकेचे संबंध आणखी मजबूत होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोनल्‍ड ट्रंप हे पंतप्रधान नरेंद्र मोदीचे खूप चांगले मित्र बनतील आणि भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत होतील सोबतच दहशतवादाच्या विरोधातील लढाईत अमेरिका भारताला साथ देईल असा दावा ट्रंप यांच्या एका सल्लागाराने केला आहे.


अमेरिकेत स्थित बिजनेसमॅन आणि भारतीय-अमेरिकी मतदारांच्या संदर्भातील ट्रंप यांचे सल्लागार शलभ कुमार यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे की पीएम मोदी आणि डोनाल्ड ट्रंप यांच्यात खूप चांगली मैत्री जमेल. दोन्ही देश खूप चांगले मित्र बनतील. ट्रंप हे मोदींना मानतात आणि त्यांच्याबाबत जाणून घेण्यासाठी ट्रम्प हे उत्सूक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लवकरच दोघांमध्ये भेट होईल असं देखील त्यांनी म्हटलं आहे.