ब्रुस्सेल : ब्रुस्सेल : बेल्जियमची राजधानी ब्रुस्सेल येथील विमानतळावर दोन तर तिसरा स्फोट मेट्रो स्टेशन जवळ झाल्याची प्राथमिक माहिती आहे.   या पहिल्या दोन स्फोटात ११ जण ठार तर २५ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अद्याप स्फोटाचे कारण कळू शकले नाही. स्काय न्यूजने दिलेल्या माहितीनुसार हे स्फोट डिपार्जर च्या ठिकाणी झाले. अमेरिकन एअरलाइन्सच्या डेस्क जवळ हे स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. 


दरम्यान, बेल्जियम मीडियाने दिलेल्या माहितीनुसार एअरपोर्टकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. 


तिसरा स्फोट मालबिक मेट्रो स्टेशनजवळ 


बेल्जियमच्या राजधानीतील मालबिक मेट्रो स्टेशनजवळ हा स्फोट झाला आहे. 


जेट एअरवेजची सर्व विमान सुरक्षित 


ब्रुस्सेलच्या विमानतळावर झालेल्या स्फोटानंतर भारतीय विमान कंपनी असलेल्या जेट एअरवेजने आपले सर्व विमान सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.