वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड़ ट्रम्प आता आणखी एक वादग्रस्त आदेशावर सही करण्याच्या तयारीत आहेत. नव्या आदेशाद्वारे अमेरिकेत काम करण्यासाठी देण्यात येणाऱ्या H1B आणि L1 प्रकाराच्या व्हिसा देण्याचे निकष आणखी कठोर करण्यात येणार आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामुळे भारतीय आयटी क्षेत्राला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. नव्या आदेशाचे निकष कठोर करण्यावरच ते थांबणार नाहीत तर त्यात H1B मिळलेल्या व्यक्तीच्या जो़डीदाराला अमेरिकेत काम करण्याचे परवानेही थांबवले जाण्याची शक्यता आहे.


नव्या आदेशाचा भारतीय आयटी क्षेत्रावर मोठा परिणाम अपेक्षित आहे. अमेरिकेत सध्या जवळपास 40 लाख भारतीय आहेत. परदेशी नागरिकांच्या क्रमवारीत अमेरिकेत भारताचा दुसरा क्रमांक आहे. सोशल मीडियावर ट्रम्प यांच्या या आदेशाची प्रत लीक झाल्यावर या सर्व भारतीयांमध्ये भीतीचं वातावरण आहे.