वॉशिंग्टन : पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा कारखाना आहे. पाकिस्तानात दहशतवाद्यांना आसरा दिला जातो. जगातील अनेक देशांचं यावर एकमत आहे. जर पाकिस्तानने त्यांच्या देशातील दहशतवाद्यांवर वेळीस कारवाई केली नाही तर याचा मोठा परिणाम पाकिस्तानला भोगावा लागणार आहे. अमेरिकेतील पाकिस्तानचे माजी राजदूत हुसैन हक्कानी यांचं म्हणणं आहे की, जर भविष्यात अमेरिकेत कोणताही मोठा दहशतवादी हल्ला झाला तर यामुळे अमेरिका-पाकिस्तान यांच्यातील संबंध बिघडतील. त्यांनी पाकिस्तानला इशारा देत म्हटलं की जर अमेरिकेचत कोणताही दहशतवादी हल्ला झाला तर अमेरिका पाकिस्तानविरोधात कारवाई करण्यास कोणताही विचार करणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूएस इंस्टिट्यूट ऑफ पीसमध्ये अमेरिकेतील दक्षिण आशियातील घडामोडींचे तज्ज्ञ लीजा कर्टिस यांनी देखील याचं समर्थन केलं आहे. त्यांनी देखील म्हटलं आहे की, जर अमेरिकेत आता पुन्हा हल्ला झाला तर पाकिस्तानला खूप वाईट दिवस पाहावे लागतील.


कर्टिस म्हणतात की, पाकिस्तान भविष्यात अमेरिकेसोबत चांगंले संबंध बनवू शकतो. यासाठी त्याला काही मोठे निर्णय घ्यावे लागतील. यामध्ये अफगानिस्तानमध्ये तालिबानवर बंदी लावणे, दुसरं फुटीरतावादी संघटनांना चर्चेसाठी तयार करावं लागेल. त्यांनी हे देखील म्हटलं आहे की, भविष्यात अमेरिका पाकिस्तानातून येणाऱ्या लोकांवर देखील नियंत्रण ठेवणर आहे.