नवी दिल्ली : विशालकाय अजगराला पाहून अनेकांची बोबडी वळते... माणसाला संपूर्ण गिळून टाकण्याची क्षमता असलेला असाच एक अजगर इंडोनेशियामध्ये आढळला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, 24 फूट लांब अजगरानं एका 25 वर्षीय तरुणाला जिवंत गिळून टाकलं... अकबर सालुबिरो नावाचा हा तरुण सुलावेसी बेटावर शेतीमध्ये काम करायला गेला होता. 26 मार्चपासून तो अचानक गायब झाला... 


कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली तेव्हा जंगलात त्यांना एक मृत अवाढव्य अजगर आढळला... या अजगराचं पोट फुगलेलं होतं. गावाच्या एका जाणत्या माणसानं या अजगरानंच अकबरला गिळलं असल्याचा अंदाज व्यक्त केला. 


त्यानंतर गावकऱ्यांनी एकत्र येत अजगराला उभा चिरला... यावेळी, या अजगराच्या पोटात अकबरचा मृतदेह सापडला.