व्हिडिओ : सहा महिन्यांच्या चिमुरडीनं रचला `वॉटर स्किईंग`चा रेकॉर्ड
ज्या वयात लहान मुलं उभं राहायचं शिकतात त्या वयात एका चिमुरडीनं वॉटर स्किंईंगचा रेकॉर्ड केलाय.
फ्लोरिडा : ज्या वयात लहान मुलं उभं राहायचं शिकतात त्या वयात एका चिमुरडीनं वॉटर स्किंईंगचा रेकॉर्ड केलाय.
खोटं वाटतंय ना... पण, एका प्रोफेशनल वॉटर स्किअर पालकांनी आपल्या सहा महिन्यांच्या मुलीला - झाएला हिला एका तलावात वॉटर स्किईंगसाठी उतरवलंय... इतक्या लहान बाळानं स्किईंग करणं हाच एक रेकॉर्ड आहे.
उल्लेखनीय म्हणजे, सहा महिन्यांच्या झाएलाला अजून नीटसं चालताही येत नाहीए... एका ज्युनिअर साईज वॉटर स्किइजच्या साहाय्यानं या चिमुरडीनं हे साध्य केलंय.
या चिमुरडीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसतोय.