माणसांशी संवाद साधणारा गोरिला, पाहा VIDEO!
प्राणी मनुष्याशी खरंच संवाद साधू शकतात? कदाचित पाळीव प्राण्यांच्या हालचाली तुम्हाला समजू शकतील... पण, वन्यप्राणी?
नवी दिल्ली : प्राणी मनुष्याशी खरंच संवाद साधू शकतात? कदाचित पाळीव प्राण्यांच्या हालचाली तुम्हाला समजू शकतील... पण, वन्यप्राणी?
या प्रश्नाचं उत्तर आहे 'कोको'... कोको हा फिमेल गोरिला माणसांशी संवाद साधतो... गेल्या ४४ वर्षांपासून तो शब्दांच्या पलिकडची भाषा शिकतोय.
पॅन्नी पॅटरसन ही स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएट झालेली महिला त्याला ही भाषा शिकवतेय.
या गोरिलाच्या ४५ व्या वाढदिवसानिमित्त बीसीसीनं त्याच्यावर एक डॉक्युमेटरी बनवलीय. 'कोको : द गोरिला हू टॉक टू पीपल' ही डॉक्युमेंटरी बुधवारी, १५ जून रोजी प्रसारित यूरोपमध्ये प्रसारित होणार आहे.