नवी दिल्ली : सौदी अरबमध्ये चित्रित करण्यात आलेला एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर चर्चेचा विषय ठरलाय. हा व्हिडिओ एका फॅमिली थेरपिस्टनं अपलोड केलाय... आणि या व्हिडिओत तो आपल्या पत्नीला मारहाण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सुचवताना दिसतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'इंडिपेडन्ट डॉट को डॉट यूके' या वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, या फॅमिली थेरपिस्टचं नाव आहे खालीफ अल-सकबी... 


पत्नीला मारहाण करण्याचे असे आहेत त्यांचे सल्ले... 


- पत्नीला मारहाण करण्यामागचा हेतू आपला राग बाहेर काढणं नव्हे तर तिला 'शिस्त' शिकवणं असायला हवा, असं हे महाशय या व्हिडिओत सांगताना दिसतायत. 


- यासाठी त्यांनी इस्लामचा हवालाही दिलाय. पत्नीला मारहाण करताना इस्लामी अटीही पूर्ण व्हायला हव्यात, असाही त्यांचा सल्ला आहे. 


- पत्नीला मारहाण करण्यासाठी रॉड किंवा धारदार शस्त्राचा नाही तर दात साफ करण्याच्या टूथपिक किंवा रुमालाचा वापर करायला हवा. 


टीव्हीवरही झाला प्रदर्शित


धक्कादायक म्हणजे, या व्हिडिओला सौदी सरकारची मंजुरीही मिळाली आणि त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात हा व्हिडिओ टीव्हीवरही प्रदर्शित करण्यात आला. या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेच्या मिडल ईस्ट मीडिया रिसर्च इन्स्टिट्यूटनं हा व्हिडिओ भाषांतरीत केलाय.